ग्रुप ग्रामपंचायत कोचाई–बोरमाळ

कोचाई–बोरमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोचाई व बोरमाळ या गावांची एकत्रित लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार सुमारे 7,578 च्या आसपास आहे. यामध्ये कोचाई गावाची लोकसंख्या सुमारे 3,539 असून त्यात अंदाजे 1,703 पुरुष व 1,836 महिला आहेत, तर बोरमाळ गावाची लोकसंख्या सुमारे 1,661 असून त्यात सुमारे 800 पुरुष व 861 महिला समाविष्ट आहेत. गावांमध्ये एकत्रितपणे सुमारे 600 ते 700 कुटुंबे वास्तव्यास आहेत. 0 ते 6 वयोगटातील बालकांची संख्या लक्षणीय असून त्यामुळे गावातील लोकसंख्या तुलनेने तरुण आहे. स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित असून महिलांचे प्रमाण किंचित जास्त दिसून येते, जे ग्रामीण भागासाठी सकारात्मक बाब मानली जाते. या भागातील बहुसंख्य लोकसंख्या अनुसूचित जमाती (ST) समाजातील असून वारली, कातकरी यांसारख्या आदिवासी समाजाचे वर्चस्व आहे. लोकसंख्या वाढ ही नैसर्गिकरीत्या होत असून काही प्रमाणात स्थलांतर (कामासाठी बाहेर जाणे) देखील आढळते, तरीही गावाची लोकसंख्या स्थिर व वाढत्या स्वरूपाची आहे.

लोकसंख्येची माहिती

क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
7,578
पुरुष लोकसंख्या
3,753
महिला लोकसंख्या
3,825
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

14

होय
प्राथमिक शाळाहोय 9 होय
माध्यमिक शाळाहोय3होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
समुदाय भवन (Community Hall)होय 4होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय4होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय4नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय3होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत कोचाई–बोरमाळ

बँकेचे नाव :दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

शाखेचे नाव:तलासरी 

अकाउंट नंबर : 006600300000082

आई एफ एस सी कोड :TDCB0000062

पत्ता : राजपूत मॉल , नॅशनल हायवे, मु.पो.तलासरी,ता-पालघर-(401606)